वाह दादा वाह! गोर-गरीब गरजुंसाठी गांगुलीकडून 50 लाखांची मदत

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो लोकांना या व्हायरसचा फटका बसला आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास बसला आहे. उद्योगपती, उदयोजक पुढे येऊन सरकारला आर्थिक मदत करत आहेत. अशातच गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत करण्याचा निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला आहे.

21 दिवसांच्या लॉकडाऊनने अनेक लोक बाधित आहेत. अशा लोकांच्या समर्थनार्थ गांगुली पुढे आला आहे. त्यामुळेच 50 लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचे वचन गांगुलीने दिलं आहे.

वाचा :  कोरोना व्हायरसने क्रिकेट जगतातला पहिला बळी घेतला