देश म्हणून आपण चाललोय कुठे??; राज ठाकरेंची तोफ पुन्हा मोदींविरोधात धडाडली

मुंबई | पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता. लोकांची अपेक्षा होती की लॉकडाऊनविषयी त्यांनी काहीतरी बोलावं. पण ते काहीच बोलले नाहीत. लोकांमध्ये संभ्रम असताना संभ्रावस्था त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने संपवायची असते. मात्र त्यांच्याकडून असं होत नाही, अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी मोदींवर केली आहे.

वाचा :  आपल्याला कोरोनाला हरवायचंय… आर्थिक मदत करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन

हात जोडून विनंती आहे, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल, असं कळकळीचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.