केंद्र शासनाकडून मदतीचा हात; महिलांच्या खात्यात 500 तर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा

नवी दिल्ली | कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाउमुळे रोजगार बंद झाला. त्यामुळे लोकांच्या पोटापाण्यावर गदा आली आहे. अशातच केंद्र शासनाने सर्वसामान्य लोकांना मदतीची हात दिला आहे.

आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या बचत खात्यात 500 रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची आर्थिक रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतंर्गत 2 हजार रुपये ही पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

वाचा :  “14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवणार नाही”