कौतुकास्पद! कचऱ्यापासून 600 ड्रोनची निर्मिती करणाऱ्या भारतीय तरूणाला जगभरातून मागणी

बंगळुरू | कर्नाटकमधील एनएम प्रतापने ई-कचऱ्याच्या मदतीने 600 ड्रोन तयार केले आहेत. त्याच्या या उत्कुष्ट कामगिरीमुळे सर्वच त्याचं कौतुक केलं जात आहे. तसेच ड्रोन वैज्ञानिक म्हणून त्याला नवी ओळख मिळालेली आहे.

प्रतापच्या कलागुणांमुळे जगभरातील अनेक देशामधून त्याला ड्रोन बनवण्याचं निमंत्रणही मिळालं आहे. प्रतापला वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदाच ड्रोनमुळे ओळख मिळाली. त्याने ड्रोन चालवण्यापासून ती खोलून रिपेअरिंग करण्यास सुरूवात केली आहे.

वाचा :  BSNLचा धमाका; 96 रुपयात महिनाभर रोज मिळणार 10GB 4G डाटा