‘रामायण’, ‘महाभारता’नंतर आता ‘शक्तिमान’ आणि ‘चाणक्य’ही प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली. आता 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान ‘शक्तिमान’ आणि ‘चाणक्य’ या दोन्ही लोकप्रिय मालिका सुद्धा पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवाव्यात, अशी जोरदार मागणी सोशल मीडियातून करण्यात येत आहे.

रामानंद सागर यांच्या रामायण आणि बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत सीरियलनंतर आता सरकारने ‘चाणक्य’ आणि शक्तीमान’ या दोन मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या दोन्ही मालिका कधीपासून टीव्हीवर दाखवल्या जाणार आहेत हे अद्याप कळलेलं नाही.

वाचा :  अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह