कौतुकास्पद! कोरोनाने हैदोस घातलेल्या स्पेनमध्ये मेसीने दिले तब्बल इतके कोटी

मुंबई | सध्या करोनाने संपूर्ण देशाला ग्रासलं आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. अर्जेंटिना आणि बार्सिलोना फुटबॉल क्लबचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेसी याने आपला दिलदारपणा दाखवून दिला आहे.

आता मोठी मदत करण्याची वेळ आली आहे. देशात सध्या उद्भवलेल्या आपात्कालीन स्थिती दरम्यान मी माझ्या मानधनात 70 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मेसीने म्हटलं आहे. याबाबतची मेसीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

वाचा :  पहिला देश, बाकी सारं नंतर; रोहित शर्माचं अभिमान वाटावं असं उत्तर