“लोकहो, घरात व्यायाम करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा; आपल्याला युद्ध जिंकायचंय”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांनी घरीच बसावं. घर हे आपले गडकिल्ले आहेत. तसंच लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरात व्यायाम करावा, ज्यांना हृदयाचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवावं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

आपण जर जीवनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क घालून घराबाहेर पडा. मास्क नसल्यास साध्या कापडाच्या 2 ते3 करून वापरा. प्रत्येकाचं कापड वेगळं असावं. गरम पाण्याने धुवून पुन्हा ते वापरले तरी चालेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

वाचा :  आपल्याला कोरोनाला हरवायचंय… आर्थिक मदत करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन