“14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवणार नाही”

नवी दिल्ली | भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की 14 एप्रिलला संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे.

पंतप्रधानांनी 14 तारखेनंतर लगेचच पूर्णपणे लॉकडाउन हटवणार नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते.

वाचा :  गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण? पाहा काय आहे सत्य…

कोरोनाच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य सारखं नसणार आहे, असंही मोदींनी म्हटलं असल्याची माहिती पिनाकी मिश्रा यांनी दिली आहे.