अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह

लखनऊ | बॉलिवूड सिंगर कनिका कपूरची पाचव्यांदा कोरोना टेस्ट करण्यात आली आणि यावेळी तिचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. याआधी चारही वेळा कनिकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

कनिकाची तब्येत आता स्थिर आहे मात्र अजून काही दिवस तिला रुग्णालयात ठेवण्यात येईल. कनिका आता बरी आहे आणि ती बोलू शकते तसेच आरामात आपली काम करु शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

वाचा :  ‘या’ गायिकेचा बेजबादारपणा, कोरोनाची लागण झाली असतानाही 500 लोकांसोबत केली पार्टी

कनिकावर लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत. कनिकाचा चौथा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तिच्या कुटुंबीयांच्या चिंता वाढली होती.

दरम्यान, कनिकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भावूक पोस्ट देखील शेअर केली होती.