कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही

मुंबई | लिटील मास्टर सुनिल गावसकर यांनी कोरोना विरोधातल्या लढ्यात मदतीचा हात दिला आहे. त्यांनी 59 लाख रूपयांची मदत केली आहे. मात्र त्यांनी जाहीरातबाजी टाळण्यासाठी कुठेही गवगवा केला नाही.

मुंबईचा माजी कसोटीपटू अमोल मुजुमदार याने ट्विट करत गावसकर यांनी ही मदत दिल्याचं सांगितलं आहे. गावसकरांनी 35 लाख रूपये पंतप्रधान केअर फंडात तर 24 लाख रूपये महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आहेत.

वाचा :  पहिला देश, बाकी सारं नंतर; रोहित शर्माचं अभिमान वाटावं असं उत्तर

क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा इरफान पठाण तसंच युसुफ पठाण यांनीही कोरोनाच्या लढ्यात भरघोस मदत दिली आहे.

दरम्यान, कोरोनाची लढाईत सर्वच क्षेत्रातले दानशूर आता पुढे येऊन मदतीचा हात देत आहे. उद्योग क्षेत्रातून देखील रतन टाटा, मुकेश अंबानी, आदित्य बिर्ला ग्रुप यांनी मोठी मदत केली आहे. तर सिनेक्षेत्रातूनही मोठी मदत मिळाली आहे.

वाचा :  कोरोना व्हायरसने क्रिकेट जगतातला पहिला बळी घेतला